तंत्रज्ञान

iPhone 15: महागड्या iPhone 15 ची मुंबईकरांमध्ये क्रेझ, आजपासून विक्री सुरु...

आयफोन प्रेमींची प्रतीक्षा आज अखेर संपली आहे. याचं कारण म्हणजे नुकत्याच लॉंन्च झालेल्या आयफोनची आजपासून विक्री सुरु झाली आहे.

Published by : Team Lokshahi

आयफोन प्रेमींची प्रतीक्षा आज अखेर संपली आहे. याचं कारण म्हणजे नुकत्याच लॉंन्च झालेल्या आयफोनची आजपासून विक्री सुरु झाली आहे. ग्राहक आजपासून iPhone 15 सीरिज खरेदी करू शकणार आहेत. नवीन सीरिची पहिली ऑफिशियल विक्री Apple च्या अधिकृत वेबसाईट आणि स्टोअर्सवर आजपासून सुरु झाली आहे.

ज्यांनी Amazon वरून स्मार्टफोनची प्री-बुकिंग केली आहे त्यांना उद्यापासून डिलिव्हरी मिळणे सुरू होईल. iPhone 15 ची किंमत भारतात 79,900 रुपयांपासून सुरू होते. कंपनी नवीन सीरिजवर ग्राहकांना सूटही देत ​​आहे.

जर तुम्ही Apple च्या अधिकृत वेबसाईटवरून iPhone 15 आणि 15 Plus खरेदी करत असाल तर कंपनी तुम्हाला एक ट्रेड-इन ऑफर देत आहे ज्या अंतर्गत तुम्हाला जुन्या फोनच्या बदल्यात 2,000 ते 67,800 रुपयांची सूट मिळू शकते.

तुम्ही Amazon वरून फोन विकत घेतल्यास, तुम्हाला iPhone 15 वर HDFC बँकेच्या कार्डवर 5000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्याचप्रमाणे क्रोमावरील HDFC बँकेच्या कार्डवर बेस मॉडेलवर 5,000 रुपये आणि प्रो मॉडेल्सवर 4,000 रुपयांची सूट दिली जात आहे. फ्लिपकार्टवर 5,000 रुपयांची सूटही दिली जात आहे. बँक ऑफर्सशिवाय एक्सचेंज ऑफर्सचाही फायदा दिला जात आहे. तुम्ही तुमचे जुने डिव्हाईस देऊन नवीन मॉडेलवर सूट मिळवू शकता.

Apple ने iPhone 15 सीरीज अंतर्गत 4 मॉडेल लॉन्च केले आहेत ज्यात iPhone 15, 15 plus, 15 Pro आणि 15 Pro Max यांचा समावेश आहे.

iPhone 15

- 128GB : 79,900 रुपये

- 256GB : 89,900 रुपये

- 512GB : 1,09,900 रुपये

iPhone 15 प्लस

- 128GB : 89,900 रुपये

- 256GB : 99,900 रुपये

- 512GB : 1,19,900 रुपये

iPhone 15 प्रो

- 128GB : 1,34,900 रूपये

- 256GB : 1,44,900 रूपये

- 512GB : 1,64,900 रूपये

- 1TB : 1,84,900 रूपये

iPhone 15 Pro Max

- 256GB : 1,59,900 रूपये

- 512GB : 1,79,900 रूपये

- 1TB : 1,99,900 रूपये

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news