Driving Licence Rule | RTO  team lokshahi
तंत्रज्ञान

Driving Licence Rule : ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं झालं सोपं, नियमात केले बदल

आरटीओ कार्यालयात रांगेत उभे राहण्याची गरज नाही

Published by : Shubham Tate

Driving Licence Rule : तुम्हालाही ड्रायव्हिंग लायसन्स घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रस्ते आणि मोटरवे मंत्रालयाने या जुलैपासून ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन नियमानंतर आता तुम्ही ड्रायव्हिंग न करताही ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता. म्हणजेच आता तुम्हाला आरटीओ कार्यालयात रांगेत उभे राहण्याची गरज नाही. (changed rule to get driving licence easily see full detail)

नव्या नियमानंतर ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सची भूमिका महत्त्वाची होणार आहे. ही प्रशिक्षण केंद्रे राज्य परिवहन प्राधिकरण किंवा केंद्र सरकारच्या अंतर्गत असतील. अशा परिस्थितीत आता ज्यांना ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे आहे, त्यांना अशा प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊन प्रथम प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. यासाठी ज्यांना वाहन चालवण्याचा परवाना बनवायचा आहे, त्यांना अशा केंद्रात नोंदणी करावी लागेल. त्यानंतर ही केंद्रे अर्जदाराची परीक्षा घेतील जी उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल. यानंतर हे केंद्र प्रमाणपत्र देईल, त्यानंतरच लोक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकतील. या प्रशिक्षण केंद्रांची वैधता पाच वर्षांसाठी असेल, त्यानंतर त्याचे नूतनीकरण करावे लागेल.

प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे परवाना दिला जाईल

प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारेच लोकांना त्यांचा ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल. यासाठी आरटीओमध्ये जाऊन कोणतीही चाचणी देण्याची गरज भासणार नाही. या केंद्रांमध्ये प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाईल. ही प्रशिक्षण केंद्रे सिम्युलेटरने सुसज्ज असतील आणि ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकही उपलब्ध असतील. या केंद्रांमध्ये हलकी मोटार, मध्यम आणि जड मोटार वाहनांना प्रशिक्षण दिले जाईल. हलक्या मोटार वाहनासाठी 1 महिन्यात 29 तासांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का