तंत्रज्ञान

Apple iPhone 11 मिळतीये 12,500 सूट, 'ही' आहे भन्नाट ऑफर

अ‍ॅपल आयफोन (Apple iPhone) 11 च्या खरेदीवर डिस्काउंट, बँक ऑफर आणि एक्सचेंज आणि बरेच काही....

Published by : Shweta Shigvan-Kavankar

आयफोन प्रेमींसाठी ई-कॉमर्स वेबसाईटवर खास ऑफर मिळत आहेत. फ्लिपकार्टवर (Flipkart) सध्या इलेक्ट्रॉनिक्सचा सेल सुरू आहे. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. अ‍ॅपल आयफोन (Apple iPhone) 11 च्या खरेदीवर फ्लिपकार्ट डिस्काउंट, बँक ऑफर आणि एक्सचेंजसारखे धमाकेदार ऑफर देत आहे.

अ‍ॅपल आयफोन 11 च्या 128GB वेरिएंटची किंमत 54,900 रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर आयफोन 11वर तब्बल 12 टक्के डिस्काउंट मिळत असून तो 47,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तर, बँक ऑफरमध्ये सीआयटीआय (CITI) बँक क्रेडिट कार्डमधून ईएमआयद्वारे घेतल्यास 1750 रुपयांची बचत केली जाऊ शकते. त्याचवेळी, सीआयटीआय बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड नॉन ईएमआय व्यवहारांवरून 2000 रुपयांची बचत केली जाऊ शकते. यासोबतच बायजूचे (BYJU'S) तीन लाइव्ह क्लासेस फ्रि मिळणार आहेत. तसेच, गाना प्लसची तीन महिन्यांसाठी सदस्यता मोफत मिळणार आहे.

फ्लिपकार्टवर अ‍ॅक्सिस बॅकेच्या (Axis Bank) कार्ड पेमेंटवर 5 टक्क्यांपर्यंत बचत करू शकता. तुम्ही हा आयफोन ईएमआयद्वारे खरेदी केल्यास तुम्ही तो मासिक 1,641 रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करू शकता.

एक्सचेंज ऑफरमध्ये अ‍ॅपल आयफोन 11 च्या खरेदीवर जुना फोन एक्सचेंज करून 12,500 रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते. यामुळे आयफोन प्रेमींसाठी फ्लिपकार्टची ऑफर पर्वणी ठरणार आहे.

अ‍ॅपल आयफोन 11 ची वैशिष्ट्ये

आयफोन 11 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले आहे, याचे रिझोल्यूशन 828x1792 पिक्सेल आणि 19.5: 9 आस्पेक्ट रेशो आहे. प्रोसेसरसाठी यात ऑक्टा कोअर Apple A13 बायोनिक प्रोसेसर आहे. कॅमेराच्या बाबतीत, या iPhone मध्ये f/1.8 अपर्चरसह 12-मेगापिक्सलचा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह दुसरा 12-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. त्याच वेळी, या आयफोनच्या पुढील बाजूस f/2.2 अपर्चरसह 12-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाल्यास यात 3110mAh बॅटरी आहे. तर या आयफोनमधील सेन्सर म्हणजे फेस आयडी, कंपास सेन्सर, बॅरोमीटर सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, एक्सेलेरोमीटर सेन्सर आणि जायरोस्कोप सेन्सर.

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय