नवी दिल्ली : मोबाईलमुळे आपल्या सर्वांचेच जीवन सुखकर झाले आहे. त्यातील अनेक अॅप्समुळे आपली सर्व कामे काही क्षणात होतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का या अॅप्सना उभारी देण्याचे काम प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांनी केले आहे. रतन टाटा यांनी ओला इलेक्ट्रिकपासून पेटीएम आणि स्नॅपडीलपर्यंत अनेक अॅप्समध्ये गुंतवणूक केली आहे. अशाच काही अॅप्सची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
1. ओला इलेक्ट्रिक
रतन टाटा यांनी 2019 मध्ये Ola Electric Mobility Pvt Ltd (Ola Electric) मध्ये गुंतवणूक केली. मात्र, त्याची रक्कम जाहीर करण्यात आली नाही. पाहिले तर ओला इलेक्ट्रिकने अल्पावधीतच बरीच बाजारपेठ काबीज केली आहे.
2. पेटीएम
रतन टाटा यांनी २०१५ मध्ये पेटीएममध्ये गुंतवणूक केली. हे एक डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. पेटीएम आज सर्वांच्याच मोबाईलमध्ये आढळतात. अनेक लोक जवळपास पेटीएमवरुनच पैशांचे ट्रान्झ्रॅक्शन करतात.
3. स्नॅपडील
स्नॅपडील ही पहिली ई-कॉमर्स कंपनी आहे. ज्यामध्ये रतन टाटांनी गुंतवणूक केली. ऑगस्ट 2014 मध्ये त्यांनी स्नॅपडीलमध्ये 0.17 टक्के स्टॉक घेतल्याचे मानले जाते. रिपोर्ट्सनुसार, रतन टाटा यांनी 5 कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक केली होती.
4. कारदेखो
कारदेखो (CarDekho) हे देशातील सर्वात मोठे ऑटो सर्च प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना ऑनलाइन कार खरेदी करण्यात मदत करते. CarDekho, BikeDekho, PriceDekho ची मूळ कंपनी गिरनार सॉफ्ट असून यामध्येही रतन टाटा यांनी गुंतवणूक केली आहे.
5. Cure.fit
Cure.fit हे आरोग्य आणि फिटनेस स्टार्ट-अप आहे. यात ऍक्सेल पार्टनर्स, कलारी कॅपिटल, चिराता व्हेन्चर्स आणि रतन टाटा यांसारख्या गुंतवणूकदारांकडून 170 दशलक्ष डॉलर गुंतवणूक केले आहेत.
6. अर्बन लॅडर
अर्बन लॅडर (UrbanLadder) हा बेंगळुरू स्थित ऑनलाइन फर्निचर किरकोळ विक्रेता आहे. ऑनलाइन फर्निचरने नोव्हेंबर 2015 मध्ये रतन टाटा यांच्याकडून निधी मिळवला. स्नॅपडीलनंतर ई-कॉमर्स फर्ममध्ये रतन टाटा यांची ही दुसरी खाजगी गुंतवणूक होती.
7. झिवामे
रतन टाटा यांनीही झिवामेमध्ये गुंतवणूक केली आहे. सप्टेंबर 2015 मध्ये रतन टाटा यांनी याला गुंतवणूक केली होती.
8. अर्बन कंपनी
डिसेंबर 2015 मध्ये अर्बन कंपनीत रतन टाटा यांच्याकडून गुंतवणूक करण्यात आली होती. अर्बन कंपनी ही गुडगाव आधारित सेवा बाजारपेठ आहे.
9. अब्रा
रतन टाटा यांनी अमेरिकन एक्सप्रेससह सिलिकॉन व्हॅली-आधारित बिटकॉइन स्टार्ट-अप अब्रामध्येही गुंतवणूक केली आहे. स्टार्ट-अॅप वापरकर्त्यांना अब्राचे अॅप वापरून कोणत्याही स्मार्टफोनवर डिजिटल रोख साठवण्याची आणि पैसे पाठविण्याची परवानगी देते.
10. लेन्सकार्ट
लेन्सकार्ट (Lenskart) हा एक लोकप्रिय ऑनलाइन चष्मा विक्रेता आहे. टाटांनी एप्रिल 2016 मध्ये यामध्ये गुंतवणूक केली होती.