लोकशाही न्यूज नेटवर्क
बँड फायनान्स २०१६ च्या वार्षिक अहवालानुसार जगातील हजारो आयटी कंपन्यांना मागे टाकत टीसीएस ने पहिला क्रमांक पटकावला आहे. टाटा ग्रुपची टाटा कंसल्टेंसी सर्विसेज , (TCS)जगातील सर्वाधिक वॅल्यू असणारी सॉफ्टवेअर कंपनी ठरली आहे. TCS ने सोमवारी Accenture ला मागे टाकत हे स्थान पटकावलं आहे. टीसीएसने मार्केट कॅपिटल १६९.९ अरब डॉलर पार केलं आहे.
२०१८ मध्ये आयबीएम ही कंपनी मार्केटमध्ये अव्वल होती. त्यावेळी आयबीएम चा एकूण रेवेन्यू टीसीएसच्या तुलनेत जवळपास ३०० टक्के अधिक होता. ८ जानेवारी २०२१ रोजी TCS ने आपल्या तिसऱ्या तिमाहीचे रिझल्ट घोषित केले होते. तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीची कामगिरी जबरदस्त झाली होती. त्यानंतर त्यांच्या शेअरमध्येही मोठी वाढ झाली. गेल्या तिमाहीमध्ये कंपनीचा नफा ८,४३३ कोटी रुपये होता. याचाच परिणाम कंपनीच्या शेअर्सवर पाहायला मिळाला. बीएसईवर टीसीएस शेअर 0.२८ टक्क्यांच्या वाढीसह ३,३१२.७० रुपयांवर ट्रेड करत आहे.