Vidharbha

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात टि 161 वाघाचा मृत्यू; कारण आले समोर…

Published by : left

अनिल ठाकरे, चंद्रपूर | ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील (Tadoba-Andhari National Park) टि 161 वाघाचा (T161 Tiger) मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. टि 161 वाघाला (T161 Tiger) रेडिओ कॉलर लावण्यात आले होते.कॅमेऱ्यात टिपलेल्या छायाचित्रात त्याचा मानेवर जखमी दिसून आली होती. कॉलर काढण्यासाठी वनविभाग त्याचावर लक्ष ठेऊन होते.अशातच आज त्याचा मृतदेहच आढळून आला.तो साडे चार वर्षाचा होता.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील टि 19 या वाघीणीला आणि तिच्या तीन बछड्यांना एप्रिल 2019 रेडीओ कॉलर लावण्यात आले.टि 19 या वाघीणीचा टि 161 हा बछडा आहे.तो साडे चार वर्षाचा होता.रेडिओ कॉलरचा शेवटचा सिंग्नल आॕगस्ट 2019 मध्ये वनविभागाला मिळाले.त्यानंतर सिंग्नल येणे बंद झाले होते.अशात 2020 आणि 2021 मध्ये टि 161 या नर वाघाचे सिंग्नल मिळाले.तो उत्तम स्थितीत होता.

फेब्रुवारी 2022 मध्ये आलेल्या छायाचित्रात टि161 वाघाचा (T161 Tiger) गळ्याभोवती जखम आढळून आली होती.या वाघाला पकडून त्याची कॉलर काढण्यासाठी वनविभाग वाघाचा हालचालीवर लक्ष ठेवून होता.29 मार्च 2022 ला हा वाघ आंबेउतारा ओढ्याजवळ दिसून आला होता.मात्र त्याला पकडण्यात वनविभागाला यश आले.आज शोध पथकाला टि161 (T161 Tiger) चा मृतदेहच आढळून आला.चंद्रपूरात शवविच्छेदन करण्यात आले नाही. गळ्याभोवती झालेल्या जखमेमुळे रक्तदोष झाल्याने वाघाचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड