देशातील पाच राज्यांत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त पदावर सुशिल चंद्रा यांची निवड झाली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज(सोमवार) सुशील चंद्रा यांची देशाचे २४ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्तांना मुख्य निवडणूक आयुक्त बनवण्याच्या परंपरेनुसार सुशील चंद्रा याचे नाव या पदासाठी अगोदरपासूनच निश्चित मानले जात होते.
या अगोदर सुनील अरोरा यांच्याकडे मुख्य निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी होती. आता सुशील चंद्रा यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचा कार्यकाळ १४ मे २०२२ पर्यंत असणार आहे.