दोन वर्षांपासून आँनलाईन शिक्षणात (online education)राहिलेल्या विद्यार्थ्यांना आता रणरणत्या उन्हातही शाळेत (Summer Vacation)जावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या एप्रिल महिन्यातील सुट्या रद्द करण्यात आल्या आहे.
शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रम पुर्ण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना दरवर्षी उन्हाळ्यात सुट्ट्या (Summer Vacation) मिळतात. परंतु यावर्षी एप्रिलमध्येही विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागणार आहे. कारणकोरोना काळामुळे जवळपास दोन वर्ष शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी शिक्षकांना अभ्यासक्रम पुर्ण करता आला नाही. त्यामुळे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी याबाबत माहिती दिली.