कोरोनाने राज्यात धुमाकूळ माजवला आहे. राज्य लॉकडाउनच्या दिशेने चालले आहे. यातच काल मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक पार पडली. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कठोर निर्बंध लादण्यात आले असून वीकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे.
यातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला जाण्याच्या अंदाज वर्तवण्यात येत आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यात येणार असून त्यानंतरच याबद्दलचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे काही दिवसांसाठी लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे.