India

stock market Update | सेन्सेक्स ५४ हजारांवर गेला, गुंतवणूकदारांची ३ लाख कोटींची कमाई

Published by : Lokshahi News

शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीचा बाजार सुरु होताच झालेल्या चौफेर खरेदीने सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला आणि ५४ हजार अंकाच्या पातळीवर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने १३० अंकाची झेप घेतली आहे. आजच्या तेजीने सलग दोन सत्रात गुंतवणूकदारांनी तीन लाख कोटींची कमाई केली आहे.

निफ्टीवर सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली आहे. आज एसबीआय, टायटन, गोदरेज कंझुमर प्रॉडक्ट, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. जुलै महिन्यात जीएसटी करात झालेली दमदार वाढ आणि औद्योगिक उत्पादनाने झेप घेतल्यानंतर गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास दुणावला असल्याचे जाणकांचे मत आहे.

आजच्या सत्रात बँक, वित्त संस्था, आयटी, ऑटो, एफएमसीजी, रियल्टी या क्षेत्रात खरेदीचा ओघ वाढला आहे. सेन्सेक्स मंचावरील २३ शेअर तेजीत आहेत. ज्यात टाटा स्टील, एचडीएफसी, इन्फोसिस, डॉ. रेड्डी लॅब, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रीड, एचडीएफसी बँक, कोटक बँक, रिलायन्स, एनटीपीसी, बजाज फायनान्स, टायटन, आयटीसी, ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा या शेअरमध्ये वाढ झाली आहे. एचयूएल, एसबीआय, टेक महिंद्रा,नेस्ले, भारती एअरटेल या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result