India

Stock Market : शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स 977, तर निफ्टी 267 अंकांनी वधारला

Published by : Shweta Chavan-Zagade

शेअर बाजाराची (Share Market) आज दमदार सुरुवात झाली असून सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीमध्ये (Nifty) मोठी उसळी पाहायला मिळत आहे. अमेरिकन आणि आशियाई बाजारांच्या तेजीमुळे देशांतर्गत बाजारालाही साथ मिळाली आहे. आज शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात झाली आहे. बाजार सुरु होताच 977 अंकानी वधारला. तर निफ्टीत देखील 267 अंकांची उसळी पाहायला मिळत आहे.

आज शेअर बाजार उघडताना बीएसई सेन्सेक्स 778.48 अंकांच्या किंवा 1.40 टक्क्यांच्या उसळीसह 56,555 वर उघडला आहे. कालच्या घसरणीनंतर NSE चा निफ्टी आज 200 हून अधिक अंकांनी वर चढून 16,876 वर उघडला आहे.

Nifty चीही उसळी

जर तुम्ही निफ्टीच्या शेअर्सची हालचाल पाहिली तर त्यातील 50 पैकी 46 शेअर्स हिरव्या चिन्हासह व्यवहार करत आहेत. सकाळी 9.30 वाजता ते 278.75 अंकांनी किंवा 1.67 टक्क्यांनी 16,941 स्तरांवर उडी मारताना दिसत आहेत. बँक निफ्टी 770 अंकांनी वाढून 35800 च्या जवळ व्यवहार करत आहे. इंडसइंड बँक 3.66 टक्क्यांनी आणि एचडीएफसी बँक 3.48 टक्क्यांनी वधारले आहेत. अॅक्सिस बँक 2.48 टक्के आणि ग्रासिम इंडस्ट्रीज 2.82 टक्क्यांनी वाढ दर्शवत आहे. टाटा मोटर्स 2.72 टक्क्यांनी वर आहे.

रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धामुळं कालपर्यंत देशांतर्गत शेअर बाजारात अस्थिरता दिसून येत होती. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक काल (मंगळवारी) 709 अंकांनी तर निफ्टीचा निर्देशांक 208 अंकांनी कोसळला होता. त्यामुळं गुंतवणूकदार पुन्हा धास्तावले होते. अशातच आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमधील उसळीमुळं गुंतवणूक दारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news