India

Stock Market | शेअर बाजारात प्रचंड तेजी!

Published by : Lokshahi News

मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजारा ताकदीने उघडले. बीएसईचा सेन्सेक्स 180.39 अंक किंवा 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 53,131.02 वर उघडला आहे. त्याच वेळी, निफ्टी 39.40 अंक किंवा 0.25 टक्के ताकदीसह 15,951.55 च्या पातळीवर दिसत आहे. बाजार उघडल्यानंतर थोड्याच वेळात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सकाळी 9.21 वाजता सेन्सेक्स 238 अंकांनी उडी मारून 53,174.97 वर पोहोचला.

बीएसई वर सुरुवातीच्या ट्रेडिंग दरम्यान, एशियन पेंट्सचा स्टॉक 2.29 टक्क्यांनी वाढला आहे. यानंतर, एचडीएफसी, पॉवर ग्रिड, टायटन, टीसीएस, टेक महिंद्राचे शेअर्स 1%पेक्षा जास्त वाढले आहेत. त्याचबरोबर इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व, अल्ट्रा सिमेंट, एम अँड एम, बजाज फायनान्स, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस, आयटीसी, सन फार्मा, एसबीआय, नेस्ले इंडिया, कोटक बँक, एक्सिस बँक आणि एलटी हे वाढले आहेत. याखेरीज आज बजाज ऑटो, टाटा स्टील, एचसीएल टेक, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेलच्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

हे टाॅप गेनर्स आणि लूजर्स
आज एनएसई वर टाॅप गेनर्समध्ये एशियन पेंट, एचडीएफसी, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड आणि टायटनचे शेअर्स समाविष्ट आहेत. त्याचबरोबर ग्रासिम, जेएसडब्ल्यू स्टील, ओएनजीसी, बजाज-ऑटो आणि एचसीएल टेक लूजर्स ठरले आहेत.

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news