India

Russia Ukraine Crisis | शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्स 1600 अंकांनी कोसळला

Published by : Shweta Chavan-Zagade

रशिया-युक्रेन युद्धाची (Russia Ukraine war) झळ शेअर बाजाराला बसू लागली आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळी बाजार सुरू होताच सेन्सेक्स (Sensex) 1600 अंकांनी कोसळला. तर, निफ्टीतही (Nifty) मोठी पडझड झाली आहे. परिणामी शेअर बाजार आज दिवसभर अस्थिर राहण्याचे संकेत आहेत.

जागतिक शेअर बाजारातही रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine war) परिणाम दिसत आहे. जागतिक शेअर बाजारात विक्रीचा मोठा दबाव दिसून येत आहे.  SGX निफ्टीमध्ये 458 अंकांची घसरण झाली आहे. निक्केईमध्ये घसरण झाली आहे. तर, हँगसँग 768 अंकांनी, तैवानचा निर्देशांक 3.15 टक्क्यांनी म्हणजे जवळपास 560 अंकांनी कोसळला आहे. तर, शांघाई शेअर बाजाराचा निर्देशांकही 1.45 टक्क्यांनी कोसळला आहे. बँक निफ्टीतही मोठी घसरण दिसून आली आहे. सेन्सेक्समधील सर्व 30 स्टॉक्समध्ये घसरण झाली आहे. निफ्टीतील 50 पैकी 46 शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

सर्व ब्रोकर्ससाठी NSE कॅश दर अपडेट होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे गुंतवणूकदार मोठे नुकसान झाले आहे. एनएससीकडून मात्र बिघाडाबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का