जळगाव जिल्ह्यातील यावल (yaval)आगारातील एसटी संपात (st strick)सहभागी असलेले चालक शिवाजी पंडित पाटील यांनी आत्महत्या (suicide)केली. मनस्थिती खराब असल्यामुळे आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले.
जळगावात शिवाजीनगर परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली असून मनस्थिती खराब असल्याने आत्महत्या करत असल्याचे शिवाजी पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिल्या सुसाईड नोटमध्ये म्हंटले आहे.
दरम्यान संपामुळे पगार बंद असल्याने शिवाजी पाटील हे आर्थिक तणावात होते. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्टिमेटम दिल्यानंतर त्या तणावातून शिवाजी पाटील यांनी जे पाऊल उचल्याचा आरोप एस टी कर्मचाऱ्यांनी केला आहे . दरम्यान घटनेनंतर शिवाजी पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी करता जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला याठिकाणी त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश पाहायला मिळाला.
विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी नोव्हेंबर महिन्यापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत व याबाबत अद्यापही तोडगा निघत नसल्याने मानसिक तान तणावाखाली येऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत