नवी दिल्ली : झिम्बाब्वे क्रिकेट संघाचे माजी कर्णधार हिथ स्ट्रीक यांचे निधन झाले आहे. त्यांची कर्करोगाशी झुंज आज अखेर अपयशी ठरली. याची माहिती स्ट्रीक यांची पत्नी नदिनीने फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. काहीच दिवसांपुर्वी 23 ऑगस्ट रोजी हिथ स्ट्रीक यांच्या मृत्यूची बातमी समोर आली, पण नंतर ती अफवा ठरली होती. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली.
नादिन स्ट्रीक यांनी लिहिले की, आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे प्रेम आणि माझ्या सुंदर मुलांच्या वडिलांना त्यांच्या घरातून एंजल्समध्ये नेण्यात आले. जिथे तो आपले शेवटचे दिवस कुटुंब आणि जवळच्या प्रियजनांसोबत घालवणार होते. ते प्रेम आणि शांततेने परिपूर्ण होते आणि कधीही एकटा घराबाहेर पडले नाही. आपले आत्मे सर्व अनंत काळासाठी एक आहेत.'
हिथ स्ट्रीकने नोव्हेंबर 1993 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तसेच त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. तर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारताविरुद्ध सप्टेंबर 2005 रोजी खेळला होता. हीथ स्ट्रीकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुमारे 12 वर्षांची आहे. हिथ स्ट्रीक यांनी झिम्बाब्वेकडून खेळताना अनेक विक्रम केले जे आजही कायम आहेत. 100 पेक्षा जास्त कसोटी विकेट्स आणि 200 हून अधिक एकदिवसीय विकेट्स घेणारा स्ट्रीक हे झिम्बाब्वेचा एकमेव गोलंदाज म्हणून गणले जातात. 2000 च्या दशकात त्यांनी झिम्बाब्वेचे कर्णधारपद भूषवले, एक कठीण काळ ज्यामध्ये बोर्ड आणि संघ यांच्यातील तणावपूर्ण संबंधांमुळे अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय संघातून माघार घेतली.