क्रीडा

युझवेंद्र चहलने काउंटी क्रिकेटमध्ये माजवली खळबळ; पाच विकेट्स घेतल्या, प्रथम श्रेणीमध्ये केली ही कामगिरी

भारताचा अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहल, जो T20 विश्वविजेत्या संघाचा भाग होता, तो इंग्लंडच्या लीग काउंटी क्रिकेटमध्ये प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरला आहे.

Published by : Dhanshree Shintre

भारताचा अनुभवी लेगस्पिनर युझवेंद्र चहल, जो T20 विश्वविजेत्या संघाचा भाग होता, तो इंग्लंडच्या लीग काउंटी क्रिकेटमध्ये प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरला आहे. चहलने इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिपच्या दोन विभागीय सामन्यात नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना पाच विकेट घेतल्या. डर्बीशायरविरुद्धच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर चहलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी केली आहे.

चहलने फर्स्ट क्लासमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या. या काळात चहलने वेन मॅडसेन, एन्युरिन डोनाल्ड, जॅक चॅपेल, ॲलेक्स थॉमसन आणि जॅक मोर्ले यांच्या विकेट घेतल्या. अशाप्रकारे भारतीय संघाच्या या अनुभवी फिरकीपटूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा पाच बळी घेण्याचा पराक्रम केला. त्याचबरोबर त्याने विकेट्सचे शतकही पूर्ण केले कारण आता पहिल्या श्रेणीत चहलच्या नावावर 100 विकेट्स आहेत. कसोटी खेळलेली नाही . मात्र, तो काउंटी चॅम्पियनशिपमधून रेड बॉल क्रिकेटशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. चहल 11 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये हरियाणाकडून खेळण्याची शक्यता आहे.

हा काउंटी क्रिकेटचा हंगाम चहलसाठी चांगला आहे. या लेगस्पिनरने गेल्या महिन्यात वन डे चषकात केंटविरुद्ध 14 धावांत पाच बळी घेतले होते. चालू सामन्याच्या पहिल्या डावात 219 धावा केल्यानंतर नॉर्थम्प्टनशायरने चहल आणि रॉब केओघ (65 धावांत तीन विकेट) यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर डर्बीशायरला 61.3 षटकांत 165 धावांत गुंडाळले. एकीकडे चहलने आपला प्रभाव सोडला तर दुसरीकडे भारतीय संघाचे फलंदाज आणि चहलचा सहकारी पृथ्वी शॉची खराब कामगिरी येथेही कायम राहिली. त्याने सामन्याच्या दोन्ही डावात चार आणि दोन धावा केल्या. शॉ त्याच्या शेवटच्या तीन प्रथम श्रेणी डावांमध्ये 50 धावांचा टप्पा ओलांडण्यातही अपयशी ठरला आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news