Yuvraj Singh  Lokshahi
क्रीडा

क्रिकेटमध्ये अजूनही युव'राज'! गोलंदाजाची केली धुलाई; 6,6,4,6...युवराज सिंगचा धडाकेबाज फलंदाजीचा VIDEO व्हायरल

भारताचा माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंगने पूर्वीप्रमाणेच आक्रमक फलंदाजी करून ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला.

Published by : Naresh Shende

Yuvraj Singh Batting Video Viral: भारताचा माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंगने पूर्वीप्रमाणेच आक्रमक फलंदाजी करून ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. सेमी फायनल सामन्यासाठी युवराज इंडिया चॅम्पियन्स संघासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. यावेळी युवराजने २८ चेंडूत २१०.७१च्या स्ट्राईक रेटने ५९ धावा कुटल्या. यामध्ये ४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. युवराज सिंगच्या वादळी खेळीचा व्हिडीओ ट्वीटरवर तुफान व्हायरल झाला आहे.

प्रतिस्पर्धी संघाकडून जेवियर डोहर्टीनं १३ वं षटक टाकलं. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर युवराजने मिड विकेटच्या दिशेनं १ धाव काढली. दुसऱ्या चेंडूवर पठाणने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं जबरदस्त षटकार ठोकला त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक धाव काढून युवराजला स्ट्राईक दिली. त्यानंतर युवराज सिंगने गिअर बदलला आणि गोलंदाजाचा धुव्वा उडवला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर लाँग ऑफवर मोठा षटकार मारला. तसच युवराजने पाचव्या चेंडूवर मिड विकेटच्या दिशेनं चौकार ठोकला. युवराज दोन मोठे फटके मारल्यानंतरही शांत राहिला नाही. त्याने पुढच्या चेंडूवर लाँग ऑनवरून मोठा षटकार मारला.

नॉर्थएम्पटनमध्ये नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करून इंडिया चॅम्पियन्सने निर्धारित षटकांमध्ये ६ विकेट्स गमावून २५४ धावा केल्या. हे लक्ष्य गाठण्यासाठई मैदानात उतरलेल्या प्रतिस्पर्धी संघाला २० षटकांत ७ विकेट्स गमावून १६८ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे टीम इंडियाचा ८६ धावांनी विजय झाला.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी