आयपीएल 2024 च्या 38 व्या सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 9 गडी गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने 18.4 षटकांत 1 गडी गमावून 183 धावा केल्या आणि सामना 9 गडी राखून जिंकला.
राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा नऊ गडी राखून पराभव करत मोसमातील सातवा विजय नोंदवला. पॉइंट टेबलमध्ये राजस्थानचे स्थान मजबूत झाले आहे. संघ 14 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. तर मुंबई सातव्या क्रमांकावर आहे. संघाच्या खात्यात सहा गुण आहेत. राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने आयपीएल 2024 चे पहिले शतक झळकावले आहे. त्याने 59 चेंडूत शतक झळकावले. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे.
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सोमवारी 22 एप्रिलला झालेल्या या सामन्यात युजवेंद्र चहलने इतिहास रचला आहे. त्याने आयपीएलमध्ये 200 विकेट पूर्ण केल्या आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे. याआधी या कोणत्याही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे चहलचे नाव इतिहासात नोंदवले गेले आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात युझवेंद्र चहल 8 व्या ओव्हरमध्ये मोहम्मद नबीला बाद केले, त्याने स्वत: तिसऱ्या चेंडूवर नबीचा अप्रतिम झेल घेतला. ही चहलची आयपीएलच्या कारकीर्दीतील 200 वी विकेट होती. ही विकेट मिळाल्यानंतर चहलने उडी मारून आणि जमिनीवर बसून आनंद साजरा केला.
दोन्ही संघाचे प्लेइंग 11:
राजस्थान रॉयल्स प्लेइंग 11 :
संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.
मुंबई इंडियन्स प्लेइंग 11 :
हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला आणि जसप्रीत बुमराह.