महिला प्रीमियर लीग 2023चा प्रवास आता शेवटच्या टप्प्यावर आहे. उद्या म्हणजेच रविवारी लीगला पहिला विजेता मिळेल. या विजेतेपदासाठी पहिला अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. या दोन्ही संघांनी साखळी फेरीतील ८ पैकी 6-6 सामने जिंकले. दिल्लीचा नेट रनरेट चांगला होता आणि त्यामुळेच त्यांना थेट फायनलमध्ये प्रवेश मिळाला. दुसरीकडे मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियर्सचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. या सीझनचा शेवटचा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर विजेतेपदाचा सामना होणार आहे.
पहिल्या सीझनमध्ये पॉईंट्स टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीचा संघ आतापर्यंत आठपैकी सहा सामने जिंकला आहे. तर मुंबई इंडियन्सच्या संघाने आठ सामन्यांपैकी सहा सामने जिंकत पॉईंट्स टेबलवर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कधी, कुठे असेल हा अंतिम सामना?
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील अंतिम सामना रविवार 26 मार्चला मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर खेळल्या जाईल. हा सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होईल. या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 चॅनलवर तुम्हाला पाहता येईल.
असे असतील दोन्ही संघ
दिल्ली कॅपिटल्स
मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, एलिस कॅप्सी, राधा यादव, शिखा पांडे, मारिजन कॅप, टायटस साधू, लॉरा हॅरिस, तारा नॉरिस, जसिया अख्तर, मिन्नू मणी, तान्या भाटिया (विकेटकीपर), पूनम यादव , जेस जोनासेन, स्नेहा दीप्ती, अरुंधती रेड्डी, अपर्णा मंडल.
मुंबई इंडियन्स
हरमनप्रीत कौर (कर्णधार), नाट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा काझी, कोमल जंजाड, प्रियांका बाला, सोनम यादव, नीलम बिश्त, जिंतामणी कलिता.