WTC Final 2023 Team Lokshahi
क्रीडा

भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकण्यासाठी तब्बल 'इतक्या' धावांचं आव्हान

ऑस्ट्रेलियाने भारतासमोर आता तगडं आव्हान ठेवले आहे.

Published by : Sagar Pradhan

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे. हा सामना ओव्हल मैदानात सुरू आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद ४६९ धावा केल्या होत्या. तर याला प्रत्युत्तर देत भारताने सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर आज चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने त्यांची इनिंग घोषीत केली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर आता तगडं आव्हान ठेवले आहे. भारताल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकण्यासाठी ४४४ धावांचं आव्हान पूर्ण करावी लागणार आहे.

या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने २९६ धावा केल्यानंतर खेळण्यासाठी आलेला ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत दिसून आला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर स्वस्तात माघारी परतले. उमेश यादवने ख्वाजाला १३ धावांवर तर मोहम्मद सिराजने डेव्हिड वॉर्नरला एका धावेवर असताना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर मार्नस लाबुशेनने सावध खेळी करत ४१ धावा केल्या.

पण उमेशच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्यानंतर रविंद्र जडेजाने स्टीव्ह स्मिथला ३४ धावांवर झेलबाद केलं. ऑस्ट्रेलियाचा कमालीचा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज ट्रेविस हेडलाही जडेजाने १८ धावांवर माघारी पाठवलं. आजच्या चौथ्या दिवसाच्या सुरूवातीला पहिल्याच षटकात उमेश यादवने मार्नस लाबूशेनला बाद केले. त्यानंतर कॅमरूनलाही जडेजाने २५ धावांवर क्लीन बोल्ड केलं. पण त्यानंतर अॅलेक्स कॅरीन अप्रतिम फलंदाजी करत ६६ धावांची नाबाद खेळी केली. तर मिचेल स्टार्कने ४१ धावा केल्या.

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे