मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला विजयासाठी तब्बल ३९८ धावांचं आव्हान दिलं होतं. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं कमाल करत आपली जबरदस्त कामगिरी दाखवली.
भारताकडून उपांत्य सामन्यात न्यूजीलंडचा 70 धावांनी पराभव झाला. या पराभवासह न्यूझीलंडचे उपांत्य फेरीतील आव्हान संपुष्टात आले. मिचेल याने 134 धावांची खेळी केली तर रचिन रविंद्र याने 578 धावा केल्या. शमीने न्यूझीलंडच्या सात फलंदाजांना बाद केले तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. विराट कोहली याने 113 बॉलमध्ये 117 धावा करत शतक पूर्ण केलं तर शुबमन गिलने 80 केल्या. कॅप्टन रोहित शर्मा याने 47 धावांची खेळी केली.
मिचेल आणि केन विल्यमसन यांच्यामध्ये 181 धावांची भागिदारी झाली. फिलिप्सने 33 चेंडूत दोन षटकार आणि चार चौकार मारले. केन विल्यमसन याने 73 चेंडूत 69 धावांची खेळी केली. या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत भारताने फायनलमध्ये धडक मारली. सूर्यकुमार यादव 1 रनवर आऊट झाला. श्रेयस अय्यरने 105 धावा केल्या तर केएल राहुलने 39 धावांची खेळी केली.