रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना शनिवारी (14 ऑक्टोबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. टीम इंडिया-पाकिस्तान हे दोन्ही संघ आता वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आमनेसामने येणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज हा सामना आयोजित करण्यात आला आहे. वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघांनी आपले दोन्ही सामने जिंकले आहेत.
सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी टॉस उडवण्यात आला. टीम इंडियाने टॉस जिंकला. कॅप्टन रोहित शर्मा याने पाकिस्तान विरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताची प्लेईंग 11 -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर
पाकिस्तानची प्लेईंग 11 :
बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद शकील, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन अफ्रिदी, हारिस रौफ.