पाकिस्तानच्या भारताविरुद्धच्या विजयाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. पाकिस्तानच्या विजयानंतर भारतामध्ये अनेक ठिकाणी फटाके फोडण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश अशा अनेक ठिकाणी याप्रकरणी कारवाई करण्यात आली. अनेकांनी या कारवाईला विरोध केला आहे. दरम्यान भारतीय संघाच्या पराभवानंतर विराटने पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवानला मिठी मारली होत, तर त्याला युएपीए अंतर्गत अटक करणार का?, असा प्रश्न महाराष्ट्र सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी टी-२० क्रिकेट विश्वचषक २०२१ मध्ये पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध यूएपीए अंतर्गत कारवाई केली त्यानंतर पीडीपीए प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी त्यावर निषेध व्याक्त केला. त्यानंतर जम्मू-काश्मीरचे स्टुडंट्स युनियनने लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी देखील आरोप रद्द करण्याची विनंती केली आहे. भारतीय संघाच्या पराभवानंतर विराटने पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवानला मिठी मारली होत. भारताने सामना गमावला असला दरम्यान पाकिस्तानमध्ये देखील विराटची जोरदार चर्चा रंगली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक फोटो शेअर करून कर्णधार विराट कोहलीची देखील स्तुती केली. आता यावर प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत. पाकिस्तानी खेळाडूचं कौतुक करणाऱ्या विराट कोहलीला युएपीए खाली अटक करणार का?, असा प्रश्न नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे.