क्रीडा

IND vs BAN: रोहित, जैस्वाल, सिराज आणि केएल राहुल पैकी कोणाला इम्पॅक्ट फील्डर ऑफ द सीरीज पुरस्कार मिळाला?

Published by : Dhanshree Shintre

बांगलादेशविरुद्ध 2-0 ने क्लीन स्वीप केल्यानंतर मंगळवारी भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांना इम्पॅक्ट फिल्डर ऑफ द सिरीज म्हणून घोषित करण्यात आले. त्यांनी भारतीय संघातील चार खेळाडूंना या पुरस्कारासाठी नामांकित केले. यामध्ये रोहित शर्मा, केएल राहुल, यशस्वी जैस्वाल आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये या पुरस्काराचे विजेते उघड झाले.

खेळाडूंनी खेळाच्या प्रत्येक विभागात दमदार कामगिरी केली होती. क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी या तिन्ही क्षेत्रात भारतीयांची कामगिरी उत्कृष्ट होती. त्यामुळेच क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीपही या खेळाडूंचे कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. ड्रेसिंग रुममध्ये भारतीय खेळाडूंच्या प्रयत्नांची प्रशंसा करत त्याने इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्कारासाठी चार स्पर्धकांची निवड केली. यादरम्यान दिलीपने मिडऑफमध्ये रोहित शर्माने घेतलेल्या झेलचे कौतुक केले. पकडण्याच्या बाबतीत हिटमॅन 'स्विस घड्याळा'इतकाच विश्वासार्ह असल्याचे त्याने सांगितले.

चारही खेळाडूंनी चांगले प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले. मात्र, केवळ दोघांनाच इम्पॅक्ट फील्डर ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला. टी दिलीप यांनी या विशेष पुरस्कारासाठी यशस्वी जैस्वाल आणि मोहम्मद सिराज यांची निवड केली. या दोघांनी क्षेत्ररक्षण करताना आपल्या सतर्कतेने भारताला विकेट्स मिळवून दिली. या मालिकेत युवा फलंदाजाने चार तर वेगवान गोलंदाजाने दोन झेल घेतले.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. पहिला सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये टीम इंडियाने पाहुण्यांचा 280 धावांनी पराभव केला. तर, दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर झाला. पावसाने प्रभावित झालेल्या या सामन्यात भारताने पुन्हा एकदा बांगलादेशचा सात गडी राखून पराभव करत मालिका 2-0 अशी जिंकली. यासह टीम इंडियाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखण्यात यश मिळविले.

Khushboo Tawde: खुशबू तावडे आणि संग्राम साळवी यांना झाली कन्याप्राप्ती, दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Devendra Fadnavis on India Alliance Protest : इंडिया आघाडीच्या मुंबईतील आंदोलनावर फडणवीसांची टीका

Navratri 2024 | Thanyachi Durgeshwari | ठाण्याच्या दुर्गेश्वरीसाठी खास देखावा; पहिली झलक पाहाच

Navratri Vrat: नवरात्रीचे व्रत करताय का? जाणून घ्या नवरात्रीचे व्रत करण्यामागे मूळ हेतु काय आहे...

Navratri 2024 Mumbai Dadar Market : नवरात्रीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; दादरचं मार्केट खरेदीसाठी प्रसिद्ध