ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषकाला जोरदार कालपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने यजमान आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. मात्र, आज ऑस्ट्रेलियामध्ये हायहोल्टेज सामना पार पडणार आहे. दोन्ही संघ यंदाच्या टी 20 विश्वचषकातील पहिला सामना खेळणार आहेत. पाकिस्तानचे भेदक गोलंदाज आणि भारताची विस्फोटक फलंदाजी, असा सामना रंगण्याची शक्यता आहे. दोन्ही संघ विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहेत. या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. तर भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिंगेला पोहचली आहे.
कधी, कुठे पाहता येईल सामना?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना ऑस्ट्रेलियामधील मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळला जाईल.या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. DD Sports वर देखील हा सामना लाइव्ह असेल.
असे असतील दोन्ही संघ
भारतीय संघ
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.
पाकिस्तान संघ
बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.