Team India Playing XI Google
क्रीडा

SL vs IND: श्रीलंकाविरोधात रंगणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज; संजू सॅमसन खेळणार का? पाहा प्लेईंग XI

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका आजपासून सुरु होणार आहे. पल्लेकेलमध्ये भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी-२० सामना सायंकाळी ७ वाजता रंगणार आहे.

Published by : Naresh Shende

Wasim Jaffer Picks Team India Playing XI For 1st T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका आजपासून सुरु होणार आहे. पल्लेकेलमध्ये भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी-२० सामना सायंकाळी ७ वाजता रंगणार आहे. ही मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू गेल्या काही दिवसांपासून कंबर कसत आहेत. परंतु, सामन्यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटर वसीम जाफरने पहिल्या टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाची प्लईंग ११ निवडली आहे. जाफरने निवडलेल्या संघात संजू सॅमसनला समाविष्ट केलं नाहीय. विकेटकीपर-फलंदाज म्हणून रिषभ पंतची निवड करण्यात आली आहे.

श्रीलंके विरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यासाठी वसीम जाफरने निवडला भारतीय संघ

वसीम जाफरने त्याच्या प्लेईंग ११ मध्ये यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलला सलामीचे फलंदाज म्हणून निवडलं आहे. तर नंबर ३ वर फलंदाजी करण्यासाठी रिषभ पंतला संधी देण्यात आली आहे. पंतने हीच भूमिका टी-२० वर्ल्डकपमध्ये पार पाडली होती. याशिवाय कर्णधार सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि रिंकू सिंगचा फिनिशर म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. तर गोलंजीसाठी जाफरने मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, रवी बिष्णोई आणि अक्षर पटेलची निवड केली आहे.

अशी आहे रिषभ पंत आणि संजू सॅमसनची आकडेवारी

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीनंतर रिषभ पंत भारताचा दुसरा सर्वात यशस्वी विकेटकीपर आहे. पंतने ६० सामन्यांमध्ये ४८ झेल घेतले आहेत. तर १० फलंदाजांना स्टंपिंग करून बाद केलं आहे. तर संजू सॅमसनने १३ सामन्यांमध्ये ११ झेल पकडले आहेत आणि ४ स्टंपिंग केल्या आहेत.

विकेटकीपर-फलंदाज म्हणून भारतीय टीम मॅनेजमेंटने धोनीनंतर रिषभ पंतला पहिली पसंती दिली आहे. यामुळेच पंत टी-२० वर्ल्डकप २०२४ चे सर्व सामने खेळू शकला. टी-२० मध्ये संजू सॅमसनपेक्षा पंतचा अनुभव जास्त आहे. पंतने ६४ सामन्यांमध्ये १२६.५६ च्या स्ट्राईक रेटने ११५८ धावा केल्या आहेत. तर संजू सॅमसनने २४ टी-२० मध्ये ४४४ धावा केल्या आहेत.

वसीम जाफरने निवडलेली टीम इंडियाची प्लेईंग ११

शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पाटेल, रिंकू सिंग, मोहम्मद सिराज, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड