क्रीडा

The Champions Stage is Ready: टीम इंडियासाठी वानखेडे स्टेडिअम सजला; फक्त चॅम्पियन्सची प्रतीक्षा

भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा 7 धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा आयसीसी T20 विश्वचषक विजेतेपदावर दमदार विजय मिळवला आहे.

Published by : Dhanshree Shintre

T20 विश्वचषक 2024 अंतिम सामना 29 जून रोजी खेळला गेला. या सामन्यात भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा 7 धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा आयसीसी T20 विश्वचषक विजेतेपदावर दमदार विजय मिळवला आहे. आज सकाळी टीम इंडियाचे मायदेशात भारतात जंगी स्वागत करण्यात आले.

टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून थोड्याच वेळात मुंबईत दाखल झाली आहे. तसेच, वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियासाठी स्टेज तयार करण्यात आला आहे. चॅम्पियन्स सुद्धा आता मरीन ड्राईव्हवर पोहोचले आहेत. टीम इंडियाचा विजयोत्सव पाहायला मिळत आहे.

टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ओपन डेक बसमध्ये टीम इंडियाचे सर्व खेळाडू आहेत. उपकर्णधार हार्दिक पंड्या याच्या हातात वर्ल्ड कप ट्रॉफी पाहायला मिळतेय. तसेच विराट कोहली, यशस्वी जयस्वाल आणि इतर खेळाडू आपल्या चाहत्यांचं उत्साह शूट करत आहेत.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती