भारतीय क्रिकेट टीमच्या जर्सीवर भारत नाव लिहण्याची मागणी माझी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग यांनी केली आहे. इंडिया हे नाव इँग्रजांनी दिलं होतं. तेव्हा अधिकृतरीत्या भारत हे नाव देण्याची मागणी विरेंद्र सेहवाग यांनी ट्विट द्वारे केली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शाह यांच्या कडे ही केली आहे.
आज विश्वचषक २०२३ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. BCCI कडून टीम इंडियाच्या संघाची माहिती देताना लिहिले, ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 साठी #TeamIndia टीम आहे. त्याला प्रतिक्रिया देतं देताना वीरेंद्र सेहवागने लिहिले, ''टीम इंडिया नाही #टीमभारत. या विश्वचषकात, जेव्हा आपण कोहली, रोहित, बुमराह, जड्डूचा जयजयकार करत असतो, तेव्हा आशा आहे की आपल्या हृदयात भारत असेल आणि खेळाडू त्यांच्यावर "इंडिया" लिहिलेली जर्सी घालतात.
यावरच ते ट्विटमध्ये म्हणाले की, माझा नेहमीच असा विश्वास आहे की आपल्यामध्ये अभिमान जागृत करणारे नाव असावे. आम्ही भारतीय आहोत, भारत हे ब्रिटीशांनी दिलेले नाव आहे आणि आमचे मूळ नाव ‘भारत’ अधिकृतरीत्या परत मिळण्यास बराच काळ लोटला आहे. मी आग्रह करतो @BCCI @जयशाह या विश्वचषकात आमच्या खेळाडूंच्या छातीवर भारत असेल.
दरम्यान, आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) स्पर्धेच्या मध्यावर एक मोठा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेच्या कोलंबो येथे होणाऱ्या अंतिम सामन्यासह सुपर-4 टप्प्यातील सर्व सामने हंबनटोटा येथे हलवण्यात आले आहेत.
या सामन्यांसाठी पल्लेकेले आणि दाम्बुला या स्थळांचाही विचार केला गेला. मात्र आता कोलंबोतील सर्व सामने हंबनटोटा येथे हलवण्यात आले आहे. कोलंबोमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पुढील काही दिवस येथे सतत पाऊस पडेल. यामुळेच एसीसीने सर्व सामने कोलंबोला हलवले आहेत.