क्रीडा

‘‘…तर बीसीसीआयने विराटला संघाबाहेर करावं”; वीरधवल खाडेचे युझरला सडेतोड उत्तर

Published by : Lokshahi News

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय जलतरणपटूंना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे काही खेळाडूंच्या कामगिरीवरून यूझरने टीका केली. त्यानंतर भारतीय जलतरणपटू वीरधवल खाडे याने ट्वीटद्वारे या यूझरला सणसणीत उत्तर दिले.

बॅकस्ट्रोक प्रकारातील जलतरणपटू श्रीहरी नटराज आणि माना पटेल यांच्या कामगिरीवर एका यूझरने टीका केली. यूझरने ट्वीटमध्ये लिहतो की तयारी नसल्यास खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये पाठवणे थांबवा. ही ऑलिम्पिक आहे, निम्न दर्जाची स्पर्धा नाही. हे खेळाडू त्यांच्या वैयक्तिक सर्वोत्कृष्ट कामगिरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. हे लाजिरवाणे आहे. ट्युनिशिया देशाकडून काहीतरी शिकण्याची गरज असल्याचे तो म्हणाला. यूझरच्या प्रत्युत्तरात वीरधवल म्हणाला, "तुमचा उपाय म्हणजे खेळाडूंना न पाठवणे. घरी बसून टिप्पणी करणे खूप सोपे आहे. मला खात्री आहे, की सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली प्रत्येक सामन्यात शतके ठोकत नाहीत. कदाचित बीसीसीआयने विराटला संघाबाहेर ठेवण्याचा विचार केला पाहिजे.

वीरधवलच्या उत्तरावर यूझर म्हणाला, "क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे, वैयक्तिक नाही. ऑलिम्पिकमध्ये विविध देशांतील खेळाडू पहा. ट्युनिशियासारख्या छोट्या देशाने सुवर्ण जिंकले.वीरधवलने पुन्हा या यूझरच्या ट्वीटवर उत्तर दिले. तो म्हणाला, "आमच्या जलतरणपटूंनी ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळवण्यासाठी गेल्या एक वर्षापासून परिश्रम घेतले आहेत, जे कौतुकास्पद आहे. आम्ही १० वर्षांपूर्वीच्यापेक्षा चांगले आहोत आणि येत्या १० वर्षांत आम्ही अधिक उत्तम होऊ." वीरधवलच्या या उत्तरावरही यूझरने सहमती दर्शवली नाही.

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका