Virat Kohli 
क्रीडा

Virat Kohli: वर्ल्डकपमध्ये 'विराट' विक्रम! कोहलीने रचला इतिहास; 'असा' कारानामा करणारा ठरला पहिला फलंदाज

भारताने प्रथम फलंदाजी करत बांगलादेशला १९७ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या बांगलादेशने २० षटकांमध्ये ८ विकेट्स गमावून १४६ धावा केल्या.

Published by : Naresh Shende

Virat Kohli World Record In T20 : टी-२० वर्ल्डकप २०२४ च्या सुपर ८ मध्ये काल शनिवारी भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना रंगला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर विराट कोहली आणि रोहित शर्माने धमाकेदार सुरुवात केली. परंतु, वेगवान खेळीनंतरही रोहित शर्माला मोठी खेळी करता आली नाही. रोहित ११ चेंडूत २३ धावा करून बाद झाल्यानं भारताला ३९ धावांवर पहिला धक्का बसला. टी-२० विश्वकप २०२४ मध्ये विराटला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये धावांचा सूर गवसला नव्हता. पण बांगलादेशविरोधात झालेल्या सामन्यात विराटने ३७ धावांची खेळी केली.

वर्ल्डकपमध्ये नंबर वन बनला विराट कोहली

बांगलादेशविरोधात ३७ धावांची खेळी केलेल्या विराटने ऐतिहासिक कारनामा करून वर्ल्डकपमध्ये मोठा विक्रम केला आहे. बांगलादेशविरोधात झालेल्या सुपर-८ सामन्यात विराटने ३७ धावांची खेळी करून इतिहास रचला. विराट वर्ल्डकपमध्ये ३ हजार धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू बनला आहे. त्याच्यासोबत या लिस्टमध्ये रोहित शर्मा, सचिन तेंडुलकरसह विश्वक्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा (वनडे+टी२०)

धावा - खेळाडू

१) ३००२ - विराट कोहली*

२) २६३७ - रोहित शर्मा

३) २५०२ - डेव्हिड वॉर्नर

४) २२७८ - सचिन तेंडुलकर

५) २१९३ - कुमार संगकारा

६) २१७४ - शाकिब अल हसन

७) २१५१ - ख्रिस गेल

भारताने बांगलादेशचा केला दारुण पराभव

भारताने प्रथम फलंदाजी करत बांगलादेशला १९७ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या बांगलादेशने २० षटकांमध्ये ८ विकेट्स गमावून १४६ धावा केल्या. त्यामुळे भारताने या सामन्यात ५० धावांनी विजय मिळवला. भारतासाठी हार्दिक पंड्याने २७ चेंडूत ५० धावांची अर्धशतकी खेळी केली. विराट कोहली (३७), रिषभ पंत (३६), शिवम दुबेनं (३४) धावा केल्या. तसच फिरकीपटू कुलदीप यादवने ३, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश