T20 World Cup 2024  
क्रीडा

T20 World Cup 2024: टी-२० क्रिकेटच्या इतिहासात अनेक विक्रमांना गवसणी; 'या' दिग्गज खेळाडूंनी कोरलं नाव

भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. १७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर टी-२० वर्ल्डकपचा दुसरा किताब जिंकण्यात टीम इंडियाला यश मिळालं आहे.

Published by : Naresh Shende

South Africa vs India, T20 World Cup 2024 : भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. १७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर टी-२० वर्ल्डकपचा दुसरा किताब जिंकण्यात टीम इंडियाला यश मिळालं आहे. २९ जूनला झालेल्या फायनलच्या अतितटीच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकांमध्ये ७ विकेट्स गमावून १७६ धावा केल्या होत्या. या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला ८ विकेट्स गमावत १६९ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे भारताने हा फायनलचा सामना ७ धावांनी जिंकला आणि टी-२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या सामन्यादरम्यान अनेक विश्वविक्रम बनले आहेत. याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

भारतीय संघाच्या विजयात जसप्रीत बुमराहचं मोलोचं योगदान राहिलं. त्याने पूर्ण टूर्नामेंटमध्ये भारतीय संघाला योग्य वेळी विकेट्स मिळवून दिल्या. त्यामुळे टीम इंडियाला प्रत्येक सामन्यात विजय मिळवणं शक्य झालं. बुमराहच्या चमकदार कामगिरीसाठी त्याला प्लेयर ऑफ दन टूर्नामेंटचा किताब देण्यात आला.

प्लेयर ऑफ द टूर्नामेंट

शाहिद आफ्रिदी - २००७

तिलकरत्ने दिलशान - २००९

केविन पीटरसन - २०१०

शेन वॉटसन - २०१२

विराट कोहली - २०१४

विराट कोहली - २०१६

डेविड वॉर्नर - २०२१

सॅम करन - २०२२

जसप्रीत बुमराह - २०२४

टी-२० फॉर्मेटमध्ये सर्वाधिक वेळा प्लेयर ऑफ द मॅचचा किताब जिंकण्यात नविराट कोहलीनं पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवला मागं टाकलं आहे. विराटच्या नावावर १६ वेळा या विक्रमाची नोंद झालीय. तर यादव (१५) दुसऱ्या स्थानावर आहे.

विराट कोहली - १६ - १२५ सामने

सूर्यकुमार यादव - १५ - ६८

रोहित शर्मा - १४ - १५९

सिकंदर रजा - १४ - ८६

मोहम्मद नबी - १४ - १२९

वीरनदीप सिंह - ७८ - १४

टीम इंडियाने वेस्ट इंडिज आणि इंग्लंडसोबत एका खास लिस्टमध्ये एन्ट्री केली आहे. या तिनही संघांनी टी-२० वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत २-२ वेळा ट्रॉफी जिंकली आहे.

वेस्टइंडिज - २०१२ आणि २०१६

इंग्लंड - २०१० आणि २०२२

भारत - २००७ आणि २०२४

टी-२० वर्ल्डकपसाठी एका एडिशनमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे संघ

८ - भारत - २०२४

८ - दक्षिण आफ्रिका - २०२४

६ - श्रीलंका - २००९

६ - ऑस्ट्रेलिया - २०१०

६ - ऑस्ट्रेलिया - २०२१

टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार

५० - रोहित शर्मा - भारत

४८ - बाबर आझम - पाकिस्तान

४५ - ब्रायन मसाबा - युगांडा

४४ - इऑन मॉर्गन - इंग्लंड

टी-२० वर्ल्डकपसाठी एका एडिशनमध्ये बेस्ट इकोनॉमी

४.१७- जसप्रीत बुमराह - २०२४

४.६० - सुनील नारायण - २०१४

५.२० - वानिंदु हसरंगा - २०२१

५.३२ - शाहिद आफ्रिदी - २००९

५.३३ - डॅनियल विटोरी - २००७

टी-२० वर्ल्डकपच्या एका एडिशनमध्ये सर्वाधिक विकेट

१७ - फजलहक फारुकी - २०२४ - अफगानिस्तान

१७ - अर्शदीप सिंग - २०२४ - भारत

१६ - वानिंदू हसरंगा - २०२१ - श्रीलंका

१५ - अजंता मेंडिस - २०२२ - श्रीलंका

१५ - वानिंदू हसरंगा - २०२२ - श्रीलंका

१५ - एनरिक नॉर्टजे - २०२४ - दक्षिण आफ्रिका

१५ - जसप्रीत बुमराह - २०२४ - भारत

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश