आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्याला सुरुवात झाली आहे. या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने सर्वाधिक झेल घेणारा भारताचा फिल्डर म्हणून विराट कोहलीने विक्रम केला आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये या सांन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात मिचेल मार्श याचा झेल घेऊन विराट कोहलीने नव्या विक्रम केला आहे. विराट कोहली आता विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू झाला आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्याच सामन्यात टॉस जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने बॅटिंगचा निर्णय घेतलाय. जसप्रीत बुमराह याने मिचेल मार्श याला शून्यावर तंबूत पाठवले. मिचेल मार्शच्या बॅटची कड घेऊन जाणारा चेंडू विराट कोहलीने पकडला. विराट कोहलीने अप्रतिम झेल घेत मार्शचा डाव संपवला. विराट कोहलीचा हा विश्वचषकातील 15 वा झेल ठरला. यासह विराट कोहलीने विश्वचषकात सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू म्हणून मान मिळवला. याआधी हा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता. आता हा विक्रम विराटच्या नावावर झाला आहे.
विराट कोहलीने विश्वचषकाच्या 27 डावामध्ये 15 झेल घेतले आहेत. 2011 ते 2023 यादरम्यान विराट कोहलीचा हा चौथा विश्वचषक आहे. या विश्वचषकातील 27 सामन्यात विराट कोहलीने 15 झेल घेतले आहेत. अनिल कुंबळे याने 18 सामन्यात 14 झेल घेतले आहेत. सचिन तेंडुलकर याला 44 सामन्यात फक्त 12 झेल घेता आलेत.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईची खेळपट्टी थोडी संथ आहे. त्यामुळे कांगारूंची सुरूवात संथ झाली. मार्श शुन्यावर बाद झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाला 10 षटकात 43 धावांपर्यंत मजल मारून दिली.