T20 World Cup 2024 : टी-२० वर्ल्डकप २०२४ ची रणधुमाळी सुरु होण्यापूर्वी पाकिस्तानचा माजी सलामीवीर दिग्गज फलंदाज वसीम जाफरने टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जाफरने ट्वीटरवर म्हटलंय, टी-२० वर्ल्डकप दरम्यान कर्णधार रोहित शर्माने सलामीला उतरलं नाही पाहिजे. शर्माच्या जागेवर विराट कोहलीनं फलंदाजीसाठी ओपनिंगला गेलं पाहिजे. माझ्या मते विराट कोहली आणि यशस्वी जैस्वालला टी-२० वर्ल्डकपसाठी ओपन केलं पाहिजे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने तिसऱ्या आणि चौथ्या नंबरवर फलंदाजी केली पाहिजे. संघाकडून कशाप्रकारे सुरुवात होते, यावर अवलंबून आहे. रोहित शर्मा स्पिनरला खूप चांगल्या पद्धतीत खेळतो. त्यामुळे त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणं मोठी समस्या होऊ शकत नाही.
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल सलामीला उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विराट कोहली नंबर ३ वर खेळणार आहे. तत्पूर्वी, विराटने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी सलामीला फलंदाजी करून धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने टूर्नामेंटमध्ये सर्वात जास्त धावा करून ऑरेंज कॅपचा अवॉर्ड जिंकला आहे.
रोहित शर्मा फिरकीपटूच्या गोलंदाजीवर जबरदस्त खेळतो - वसीम जाफर
रोहित शर्माने मिडल ऑर्डरमध्ये खेळण्याचं कारण जाफरने स्पष्टपणे सांगितलं आहे. जाफरने म्हटलं की, रोहित शर्मा स्पिनरला खूप चांगला खेळतो. याच कारणामुळे त्याने ओपन करण्याऐवजी मिडल ऑर्डरमध्ये खेळावं.
रोहित शर्मा दिर्घकाळापासून भारतीय संघासाठी ओपन करत आहे. तर विराट कोहलीने सतत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. टी-२० वर्ल्डकप दरम्यान हे दोन्ही दिग्गज त्यांच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करतात की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनला आर्यलँड विरोधात खेळायचा आहे. याआधी टीम इंडिया बांगलादेशविरोधात एक वॉर्म अप मॅच खेळणार आहे. दोन्ही संघांमध्ये हा सामना १ जूनला खेळवला जाणार आहे.