virat kohali | Ms dhoni team lokshahi
क्रीडा

धोनीच्या आठवणीत विराटने शेअर केला फोटो, म्हणाला…

Published by : Shubham Tate

virat kohali : मागील काही सामन्यांमध्ये सातत्याने वाईट खेळी दाखवत असल्याने माजी कर्णधार विराट कोहली सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल झाला होता. आपल्याला आपल्या खेळाचा दर्जा माहित असल्याने या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत आहे असेही कोहलीने एका मुलखातीत सांगितले. दरम्यान विराट कोहली महेंद्रसिंह धोनीची आठवण काढत भावूक झाला. यावेळी विराट कोहलीने (Virat kohli) गुरुवारी 25 ऑगस्टच्या रात्री माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीसोबतचा (Dhoni) एक फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तसेच या पोस्टसोबत विराटने आपली पार्टनरशिप (partnership) माझ्यासाठी कायम खास असेल अशी भावनिक कॅप्शन दिली आहे. (virat kohli shared a photo in Ms dhonis memory)

हा फोटो सध्या सोशल मीडियावर (social media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या फोटोची चर्चाच चर्चा सुरू आहे. T20 विश्वचषक 2016 चा फोटो पोस्ट करत त्याने “या व्यक्तीचा विश्वासू डेप्युटी असणं हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात आनंददायी आणि रोमांचक काळ होता. आमची भागीदारी माझ्यासाठी नेहमीच खास असेल ७+१८”,असे कॅप्शन दिले आहे. आता कोहलीच्या मनात ही पोस्ट टाकण्यामागे काय होते, ते फक्त तेच सांगू शकतात. पण 18 आणि 7 ची बेरीज 25 असण्याची शक्यता आहे. म्हणून कोहलीने 25 तारखेलाच पोस्ट केली. आजवरचे रेकॉर्ड पाहिल्यास धोनी आणि कोहली या दोघांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अनेक विजय आपल्या नावे केले आहेत.

कोहलीने २००८ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. कोहलीने 2012 च्या आशिया कपमध्येच धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून प्रथमच जबाबदारी स्वीकारली होती. धोनीनंतर त्याला 2015 मध्ये कसोटी आणि 2017 पासून ODI-T20 चे कर्णधारपद मिळाले. कोहली आणि धोनी ही पार्टनरशिप आजवर नेहमीच गाजली होती.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने