आयपीएल 2025च्या लिलावाला रविवारपासून सुरुवात झाली त्यादरम्यान अनेक स्टार खेळाडूंना मोठ्या बोली लागल्या. तर काही नावाजलेल्या खेळाडूंना अनसोल्ड ठेवण्यात आलं. तर काल म्हणजे सोमवारी लिलावाचा दुसरा दिवस होता आणि त्यामध्ये देखील अनेक खेळाडूंवर बोली लागली तर मयंक अगरवाल, अजिंक्य रहाणे, केन विलियम्सन, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर यांसारख्या खेळाडूंना अनसोल्ड राहाव लागलं. कालच्या लिलावात 13 वर्षाच्या वैभव सुर्यवंशीचा हि लिलाव लागलेला पाहायला मिळाला. त्याची लिलावात मुळ किंमत ही 30 लाख होती आणि त्याच्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्याच लढत लागलेली होती. त्यासाठी राजस्थानने तब्बल 1.10 कोटी मोजले आणि त्याला आपल्या संघात सामिल करून घेतले.
कोण आहे वैभव सुर्यवंशी
नावातचं ज्याच्या वैभव आहे असा हा वैभव सुर्यवंशी 13 वर्षाचा तरूण आयपीएलच्या लिलावात सहभागी होणारा सर्वात युवा खेळाडू आहे. वैभवने 2023-24 रणजी ट्रॉफी स्पर्धेत 2024मध्ये बिहारसाठी पदार्पण केले होते. यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या युवा संघांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवडण्यात आलं. त्यावेळी त्याने 62 बॉलमध्ये 104 रन केले होते आणि आता तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघात पाहायला मिळणार आहे. तर आयपीएलच्या लिलावात बोली लागलेला वैभव सर्वात लहान खेळाडू असल्यामुळे राजस्थानने जर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली, तर त्याला पदार्पणाचीही संधी मिळेल.
बोर्डाने लागू केलेल्या नियमानुसार वैभव खेळू शकेल का?
बोर्डाने खेळाडूंच्या सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या अंतर्गत नियमांमध्ये वयोमर्यादा लागू केली आहे जी आयसीसी स्पर्धा, द्विपक्षीय क्रिकेट आणि 19 वर्षांखालील क्रिकेटसह सर्व क्रिकेटमध्ये लागू होईल.19 वर्षांखालील आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात खेळण्यासाठी खेळाडूंचे किमान वय 15 वर्षे असणे आवश्यक आहे, असं आयसीसीने पत्रकात म्हटले आहे. पण आयपीएलने असा कोणता ही नियम लागू केलेला नाही. एखाद्या खेळाडूला खेळवण्याचा निर्णय हा फ्रँचायझीवर सोपवण्यात आलेला आहे. त्यामुळे वैभवला राहुल द्रविड व कुमार संगकारा यांच्या मार्गदर्शनाखाली आयपीएल २०२५ मध्ये खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता असू शकते.