सध्या भारतीय संघ न्यूजीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पहिला सामना पावसामुळं रद्द झाल्यावर दुसरा सामना भारताने जिंकला. आता उद्या अखेरचा निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. भारताने हा सामना जिंकल्यास मालिकाही भारत जिंकेल तर न्यूझीलंडने सामना जिंकल्यास मालिका अनिर्णीत सुटणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 22 नोव्हेंबर म्हणजेच उद्या मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि टी20 मालिकेतील शेवटच्या T20 सामन्यात पावसाची शक्यता नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या वेळे काही प्रमाणाच पाऊस पडू शकतो, पण सामना सायंकाळी सुरु होणार असल्याने सामना सुरू होईपर्यंत पाऊस थांबेल.
कधी सुरु होईल सामना?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा सामना नेपियर येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता सामना सुरू होईल. याआधी सकाळी 11.30 वाजता सामन्याचा नाणेफेक होईल.
कुठे बघता येईल हा सामना?
भारत आणि न्यूझीलंड मालिकेतील तिसरा T20 सामना दूरदर्शनच्या डीडी स्पोर्ट्स टीव्ही चॅनलवर थेट पाहू शकता. सोबतच हा सामना मोबाईलवरही पाहता येईल. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ अॅपद्वारे तुम्ही थेट सामन्याचा आनंद घेऊ शकता.
नेपियर हवामान
द वेदर चॅनलनुसार, मंगळवारी नेपियरमध्ये पावसाची 72 टक्के शक्यता आहे. येथे कमाल तापमान 24 अंश आणि किमान तापमान 14 अंश सेल्सिअस असू शकते.