ऑलिम्पिकमधील आजच्या दिवसाची सुरुवात भारतासाठी सकारात्मक ठरली. भारतासाठी स्टार अॅथलीट नीरज चोप्रानं जेलवीन थ्रो म्हणजेच भालाफेक स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. कुस्तीत देखील भारताच्या कुस्तीपटूंनी शानदार यश मिळवलं आहे. भारताचे कुस्तीपटू रवि दहिया, दीपक पुनियानं आपापल्या गटात शानदार एकतर्फी विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताची कुस्तीपटू अंशू मलिकला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.
रवि दहिया विरुद्ध कोलंबियाच्या ऑस्कर टिगरेरोस उरबानो यांच्यातील पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रविनं शानदार विजय मिळवला. रवि दहियानं हा सामना जिंकत प्री क्वार्टर फायनल सामन्यात बाजी मारली आहे. रविनं हा सामना एकतर्फी जिंकला. त्यानं कोलंबियाच्या कुस्तीपटूला 13-2 असा पराभव केला. रविकुमारनं या गटात सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. क्वार्टर फायललमध्ये त्यानं बलगेरियाच्या कुस्तीपटूला 14-4 असं पराभूत करत पुढची फेरी गाठली. सेमिफायनलमध्ये तो पाकिस्तानच्या खेळाडूशी लढणार आहे.