क्रीडा

Tokyo Olympics | मीराबाई चानूचे घर पाहाल तर डोळे पाणावून जातील

Published by : Lokshahi News

भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकची दमदार सुरुवात झाली असून स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मीराबाई चानूने अविस्मरणीय कामगीरी केली आहे. भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकच्या ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची पटकावले आहे. यानंतर मीराबाईवर सर्व स्तरावरून कौतूकाचा वर्षाव करण्यात आला. सध्या सोशल मीडियावर मीराबाईचा एका फोटोची जोरदार चर्चा होत आहे.

या फोटोमधून मीराबाईचं साधेपणाचे चित्रण सहजरीत्या झळकत आहे. आज जगभरात मीराबाईचं नाव गाजत असलं तरी मीराबाईने साधेपणा जपत पुढे वाटचाल करताना दिसत आहे. मीराबाईचा ऑलिम्पिक मेडल पटकवण्याचा प्रवास म्हणावा तितका सोप्पा नव्हता.

2016 मधील रिओ ऑलिम्पिकमध्ये तीन प्रयत्नानंतर देखील मीराबाई वजन उचलण्यात अपयशी ठरली. तिच्या पाठीला दुखण्याचा त्रास होऊ लागला तसेच तिला सराव करणेही अश्यक झाले. पण केंद्र सरकारने 71 लाख रुपये खर्च करत तिला सरावासाठी अमेरीकेत पाठवले आणि मीराबाईने आपले कतृत्व सिद्ध करत यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी बजावत मीराबाईने रौप्यपदक जिंकले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी