भारत टोक्यो ऑल्मिपिक मध्ये इतिहास रचण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताने आतापर्यंत ५ पदके जिंकली आहेत. आज भारताला 65 किलो गटामध्ये भारताचा पैलवान बजरंग पुनियाकडून आज कांस्यपदकाची अपेक्षा आहे.
65 किलो गटामध्ये भारताचा पैलवान बजरंग पुनियाची लढत अजरबैजानचा खेळाडू हाजी अलीव याच्याशी झाली. हाजी अलीव 12-5 ने बजरंग पुनियाचा पराभव केला. त्यानंतर कांस्य पदकासाठी आता बजरंग पुनियाचा सामना आज रशियातील गडझीमुराद रशीदोव्ह याच्याशी दुपारी होणार आहे.
बजरंग पुनियाचे पायाच्या बचावाचे कच्चे दुवे शुक्रवारी टोक्यो ऑल्मिपिक मधील त्याच्या पदक वाटचालीत अडथळा ठरले. पुरुषांच्या फ्रीस्टाइल कुस्तीमधील ६५ किलो वजनी गटातील उपांत्य सामन्यात तीन वेळा विश्वविजेत्या हाजी अलीव्हने त्याला धूळ चारली. त्यामुळे आता त्याच्याकडून आज कांस्यपदकाची अपेक्षा करण्यात येत आहे.