क्रीडा

Tokyo Olympic | आदिती अशोक ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर!

Published by : Lokshahi News

भारताची आंतरराष्ट्रीय गोल्फपटू आदिती अशोकनं आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताला शतकाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे. त्यामुळे भारताच्या पदकांच्या संख्येमध्ये आदिती अशोक भर घालणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

आज पहाटे ४ वाजेपासून आदिती अशोकनं गोल्फच्या चौथ्या राऊंडमध्ये आपली कमाल दाखवायला सुरुवात केली. वर्ल्ड रँकिंगमध्ये २०० व्या क्रमांकावर असणाऱ्या आदितीनं वर्ल्ड रँकिंगमध्ये अग्रस्थानावर असणाऱ्या नेल्ली कोरडा आणि मोने इनामी यांना कडवी टक्कर दिली आहे. तिसऱ्या राऊंडपर्यंत आदिती अशोकनं आपलं दुसरं स्थान कायम राखलं असताना चौथ्या राऊंच्या १६ होल्सनंतर आदिती तिसऱ्या स्थानावर आली आहे. त्यामुळे आदितीला गोल्ड, सिल्व्हर किंवा ब्राँझ यापैकी कोणतंही मेडल मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result