क्रीडा

विराट कोहली- देवदत्त पडिक्कल यांचा हा किस्सा तुम्हाला ठाऊक आहे का?

Published by : Saurabh Gondhali

आयपीएल IPL मध्ये अनेक चित्र विचित्र प्रसंग घडत असतात. तसेच त्या बरोबर काही चांगले असतात तर काही वाईट असतात. असाच एक किस्सा देवदत्त पडिक्कल DEVADATTA PADIKKAL या युवा खेळाडू बरोबरचा घडला आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाकडून खेळताना केली. त्यावेळी या संघाचा कर्णधार विराट कोहली VIRAT KOHLI हा होता. देवदत्त यांनी नुकत्याच आपल्या का मुलाखतीमध्ये विराटच्या संदर्भातील आपला एक किस्सा सांगितला आहे.

क्रिकट्रॅकर या वेबसाईटने शेअर केलेल्या व्हिडिओत देवदत्त पडिक्कल म्हणतो की, 'मला ही घटना चांगली आठवते. ज्यावेळी विराट कोहलीला कॅमेरा फॉलो करत होता त्यावेळी त्याने कॅमेरामनला सांगितले होते की त्याच्याकडे (देवदत्त) जा आज त्याने मोठी कामगिरी केली आहे. यानंतर ही घटना ज्या ज्या वेळी मला आठवते त्या त्या वेळी माझ्या अंगावर शहारे येतात.' देवदत्त पुढे म्हणाला की, 'मला त्या दिवसाबाबत सगळे व्यवस्थित आठवते. मी उभ्या आयुष्यात कधी विचार केला नव्हता की मी 20 व्या वर्षी आयपीएलमध्ये शतक ठोकू शकेन. मात्र मी ऐतिहासिक अशा वानखेडेवर शतक ठोकले. तेही विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स यासारख्या खेळाडूंच्या समोर. हे माझ्यासाठी अद्भुत होते.'

भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या पडिक्कलने सांगितले की, 'भारताकडून खेळणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कामगिरी आहे. एका मुलाला क्रिकेट खेळायला आवडते त्याचे सर्वात मोठे ध्येय हे देशाकडून खेळणे हेच असते. त्यामुळे तो क्षण माझ्या आयुष्टातील सर्वात मोठा क्षण आहे. तसेच माझ्या कुटुंबियांसाठी देखील ही फार मोठी गोष्ट आहे. कारण माझ्या क्रिकेटसाठी आम्ही हैदराबादमधून बंगळुरूला शिफ्ट झालो होतो.'

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय