कोरोना महामारीमुळे दीड वर्षानंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु शाळेत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धा यावर्षी होणार नाही असा निर्णय शालेय क्रीडा मंडळानी घेतला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे आयपीएल अर्ध्यावर थांबवण्यात आली त्याचबरोबर महाराष्ट्रात होणारी राष्ट्रीय खो-खो स्पर्धा देखील यावर्षी रद्द करण्यात आली.शाळा सुरु झाल्यानंतर क्रीडा पुन्हा सुरु होतील अशी चिन्ह अद्यापही दिसत नाही.
हॅरिस-गाइल्स शील्ड स्पर्धेत १४ ते १६ वर्षाखालील मुले खेळतात आणि या मुलांच्या आरोग्याची काळजी घेने जोखीमेचे आहेत.
देशा अंतर्गत स्थानिक क्रिकेटला प्रारंभ झाल्यावर परिस्थितीचा आढावा घेणे सोपे होईल त्यामुळे पुढील वर्षाचा शालेय क्रिकेटचे आयोजन कसे होऊ शकेल असे मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) कार्यकारणीचे सदस्य नदीम मेमन म्हणाले, शालेय क्रिकेट मध्ये महत्वाचे स्थान असलेली हॅरिस-गाइल्स शील्ड स्पर्धा दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये खेळण्यात येते.तसेच 'एमडीएफए' च्या फुटबॉल स्पर्धाचा हंगामा या काळात बहरतो."मुळात शासनाचा शाळा सुरु करण्याचा निर्णय मला पटलेला नाही.आणि पालक सुद्धा पूर्णपणे मुलांना शाळेत पाठवण्यासाठी तयार नाहीत.
तसेच हॉकीसाठी मुंबई मध्ये दोन मैदान उपलब्ध आहेत.आणि शासनाकडून क्रीडा क्षेत्र सुरु करण्याबाबत परवानगी मिळाल्यावर आम्ही सर्वप्रथम मैदानांची चाचणी करण्यासह पुढील रूपरेषा आखू यासाठी आम्हाला तीन ते चार महिन्यांचा अवधी सहज लागेल अशी माहिती शालेय क्रीडा संघटनेतील (एमएसएसए)हॉकीचे सचिव लॉरेन्स बिंग यांनी सांगितल.