टीम इंडिया आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या टी-20 सीरिजमधील दुसरी मॅच इंदूर येथे खेळवण्यात आली. या मॅचमध्ये टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ही मॅच सहा विकेट्सने जिंकली आहे. टीम इंडियाने 15.4 ओव्हर्समध्ये 173 रन्स करत मॅच जिंकली आहे. या विजयासोबतच टीम इंडियाने तीन मॅचेसची सीरिज सुद्धा जिंकली आहे
अफगाणिस्तानच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवातच खराब झाली. मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाची पहिली विकेट पडली. कॅप्टन रोहित शर्मा शून्यावर माघारी परतला. शिवम दुबेने 32 चेंडूत 63 धावांची नाबाद खेळी केली. जैस्वालने 34 चेंडूत 68 धावांची शानदार खेळी केली. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी, अर्शदीप सिंगने तीन, अक्षर आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी दोन बळी घेत अफगाणिस्तानला 172 धावांत रोखले.
टीम इंडियाकडून अर्शदीप सिंग याने सर्वाधिक म्हणजेच तीन विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग याने 4 ओव्हर्समध्ये 32 रन्स देत तीन विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल या दोघांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोई याने 4 ओव्हर्समध्ये 39 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलने 4 ओव्हर्समध्ये 17 रन्स देत दोन विकेट्स घेतल्या. तर शिवम दुबे याने तीन ओव्हर्समध्ये 36 रन्स देत एक विकेट घेतली. या विजयासोबतच टीम इंडियाने तीन मॅचेसची सीरिज सुद्धा जिंकली आहे.