भारताचा माजी गोलंदाज प्रवीण कुमार हार्दिक पंड्यावर भडकला आहे. माध्यमांशी बोलताना प्रवीण कुमारे बीसीसीआयवर निशाणा साधलाय. बीसीसीआयने सर्व खेळाडूंना घरेलू क्रिकेट खेळणं अनिवार्य केलं आहे. याच मुद्द्यावर बोलताना प्रवीणने म्हटलं की, बीसीसीआयने घेतलेला निर्णय योग्य आहे. सर्वांना घरेलू क्रिकेट खेळायला पाहिजे. हेच योग्य आहे. मग तो ईशान किशन असो किंवा श्रेयस अय्यर. हार्दिक पंड्यालाही असाच नियम लागू होतो. तो काय चंद्रावरून उतरला आहे का? बीसीसीआयला या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल.
प्रवीण कुमार पुढे म्हणाला, हार्दिक पंड्या चंद्रावरून उतरला आहे का? त्यालाही खेळावं लागेल. त्याच्यासाठी वेगळा नियम का आहे? बोर्डाने त्याला सुनावलं पाहिजे. तुम्ही केवळ घरेलू टी-२० टूर्नामेंट का खेळणार? तिन्ही फॉर्मेटचं खेळ खेळावं. तुम्हाला फक्त टी-२० खेळायचं आहे. मग तुम्ही ६०-७० कसोटी सामने खेळलेत का? देशाला तुमची गरज आहे. जर तुम्हाला कसोटी क्रिकेट खेळायचं नाहीय, तर मग तुम्ही तसं लेखी स्वरुपात द्या. पंड्याला कसोटी खेळायचं नाही याबाबत त्याला कदाचित सांगण्यात आलं असेल. माझ्याकडे याबाबत स्पष्ट माहिती नाहीय.
पायाला दुखापत झाल्याने हार्दिक पंड्या विश्वकप २०२३ मधून बाहेर झाला होता. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाहीय. आता पांड्या फिट झाला असून आयपीएल २०२४ मध्ये खेळणार आहे. नुकत्याच झालेल्या डी वाय पाटील कपमध्ये हार्दिक पंड्या मैदानात उतरला होता. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचं नेतृत्व देण्यात आलं आहे. मुंबई इंडियन्स २०२४ मध्ये २४ मार्चला गुजरात टायटन्सविरोधात पहिला सामना खेळणार आहे.