India vs Zimbabwe T-20 Series Latest Update : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका रंगली. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताने सलग चार सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिका खिशात घातली. आज झालेल्या पाचव्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वेविरोधात ४२ धावांनी विजय मिळवला. टीम इंडियानं झिम्बाब्वेला १६८ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेचा आख्खआ संघ १२५ धावांवर गारद झाला. त्याामुळे टीम इंडियाने ४-१ नं आघाडी घेत मालिका विजय मिळवला. त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलने माध्यमांना प्रतिक्रिया देताना संघाच्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला.
काय म्हणाला शुबमन गिल?
झिम्बाब्वे विरोधात ४-१ ने टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार शुबमन गिलने माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली. शुबमन म्हणाला, मालिका शानदार होती. पहिला पराभव झाल्यानंतर सामने जिंकण्याची भूख कमालीची होती. अनेक खेळाडूंना येथील परिस्थितीचा अनुभव नव्हता. पण त्यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. मी एशिया कपसाठी श्रीलंकेला गेलो होतो. तिथे जाऊन मला चांगली कामगिरी करायची आहे.
भारतासाठी वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने ४ विकेट्स घेतल्या. तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर आणि अभिषेक शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली. तर शिवम दुबे २ विकेट घेण्यात यशस्वी झाला. संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी साकारली. संजूने ४५ चेंडूत ५८ धावा केल्या. यामध्ये ४ षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. रियान परागने २४ चेंडूत २२ धावा केल्या. तर शिवम दुबेनं १२ चेंडूत २६ धावा कुटल्या. यामध्ये २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. झिम्बाब्वेसाठी सिकंदर रझा, रिचर्ड आणि ब्रँडणने प्रत्येकी १ विकेट घेतली. तर मुझारबानीला २ विकेट घेण्यात यश मिळालं.