India vs Zimbabwe Twitter
क्रीडा

IND vs ZIM: जैस्वालच्या वादळी खेळीनं भारत झाला 'यशस्वी'; झिम्बाब्वेचा पराभव करून मालिका घातली खिशात, गिलही चमकला

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने झिम्बाब्वेविरोधात सलग तीन सामने जिंकले.

Published by : Naresh Shende

India vs Zimbabwe 3rd T20 Scorecard : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने झिम्बाब्वेविरोधात सलग तीन सामने जिंकले. हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेनं प्रथम फलंदाजी करून निर्धारित २० षटकांमध्ये ७ विकेट्स गमावून १५२ धावा केल्या. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियानं १५.२ षटकात बिनबाद १५६ धावा करून हा सामना जिंकला. त्यामुळे भारतानं ३-१ ने आघाडी घेत पाच सामन्यांची टी-२० मालिका खिशात घातली.

यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलने वादळी अर्धशतक ठोकून टीम इंडियाला विजयी केलं. जैस्वालने ५३ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकार ठोकून ९३ धावांची नाबाद खेळी केली. तर शुबमन गिलने ३९ चेंडूत ५८ धावांची खेळी साकारली.

झिम्बाब्वेसाठी कर्णधार सिकंदर रझाने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. तर सलामीवीर मधीवरेनं २४ चेंडूत २५ धावा केल्या. तसच टी मरुमानीनं ३१ चेंडूत ३२ धावा केल्या. भारतासाठी खलील अहमदने २ विकेट्स घेतल्या. तर तुषार देशपांडे, रवी बिष्णोई, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड