भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने ४-१ ने आघाडी घेत विजयाचा झेंडा फडकवला. भारताने एक डाव राखून आणि ६५ धावांनी इंग्लंडवर मात केली. कसोटी मालिकेत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत महत्वाचं विधान केलं. भारताच्या युवा खेळाडूंवर स्तुतीसुमने उधळली. तसंच त्याने त्याच्या करिअरच्या मागील दोन तीन वर्षांच्या इतिहासाबाबतही सांगितलं.
रोहितने दिनेश कार्तिकच्या निवृत्तीबद्दल बोलताना म्हटलं की, जर एखाद्या दिवशी सकाळी उठल्यावर मला वाटलं की, क्रिकेट खेळण्याबाबत मी सकारात्मक नाही, तेव्हा मी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं जाहीर करेन. रोहित एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हणाला की, मागील दोन-तीन वर्षांपासून माझ्या खेळाचं स्तर उंचावला आहे, असं मी प्रामाणिकपणे सांगू शकतो. मी सर्वश्रेष्ठ क्रिकेट खेळत आहे.
मी आकड्यांना जास्त पाहत नाही किंवा याबाबत जास्त विचारही करत नाही. मोठी खेळी आणि धावसंख्या करणे हे तितकचं महत्वाचं आहे. पण दिवसाच्या शेवटी अशाप्रकारे खेळणे क्रिकेटची संस्कृती आहे. याकडे लक्ष केंद्रीत करत होतो आणि आताही करत आहे. मला काही बदल करायचे होते. तुम्हाला माहित आहे की, खेळाडू येतात आणि जातात, पण हे क्रिकेटच्या आकड्यांनी जोडलेली गोष्ट आहे आणि मला या गोष्टीला पूर्णपणे वेगळं ठेवायचं आहे.