भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टेस्ट मॅचेसच्या सीरिजमधील पहिली मॅच हैदराबाद येथे खेळवण्यात आली. हैदराबादमध्ये सुरु असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारताचा 28 धावांनी दारुण पराभव केला आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला पराभूत करत 5 मॅचेसच्या सीरिजमध्ये इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
हैदराबाद येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या टेस्ट मॅचच्या इंग्लंडची संपूर्ण टीम 246 रन्सपर्यंत मजल मारु शकली. त्यानंतर मैदानात बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाने 436 रन्स करत इंग्लंडला लीड दिला. मात्र, इंग्लंडने दुसऱ्या इनिंगमध्ये जबरदस्त पुनरागमन केले आणि 420 रन्स केले. इंग्लंडने भारतापुढे विजयसाठी 231 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, भारताला 202 धावाच करता आल्या. भारताकडून दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला कर्णधार रोहित शर्मा आणि त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि केएस भरतने कडवी झुंज दिली.
चौथ्या दिवशी इंग्लंडच्या संघाने मैदानात कमाल करुन दाखवली. भारतापुढे विजयसाठी 231 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, भारताला 202 धावाच करता आल्या आणि भारताचा 28 धावांनी पराभव झाला. मॅचच्या शेवटच्या इनिंगमध्ये टीम इंडियाचे बॅट्समन पूर्ण फ्लॉप झाले. एकाही प्लेअरला 40 रन्सहून अधिकचा स्कोअर करता आला नाही. या इनिंगमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक रन्स रोहित शर्माने (39 रन्स) केले. त्यानंतर 8 व्या विकेटसाठी रविचंद्रन अश्विन आणि केएस भरतने कडवी झुंज दिली. मात्र, टॉम हर्टलीने पटकावलेल्या 7 विकेट्सच्या जोरावर इंग्लंडने हा विजय मिळवला.