Gautam Gambhir On Virat Kohli: टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत विराट कोहलीबाबत असलेल्या नात्याबाबत मोठं विधान केलं. गौतम माध्यमांशी बोलताना म्हणाला, विराट कोहलीसोबत माझं नातं आपआपासातील आहे. टीआरपीसाठी नाही. विराट कोहलीसोबत असलेलं नातं टीआरपीसाठी नाही. आम्ही भारताचं प्रतिनिधीत्व करत आहोत. आम्ही १४० कोटी भारतीयांचं प्रतिनिधीत्व करत आहोत. मैदानाच्या बाहेर आमच्यात चांगलं नातं आहे. पण हे जनतेसाठी नाही. खेळत असताना किंवा मैदानाच्या बाहेर मी विराटशी कितीवेळा चर्चा केली आहे, हे मह्त्त्वाचं नाही. तो पूर्णपणे प्रोफेशनल आहे आणि जागतिक स्तरावरचा एथलिट आहे. तो अशाच प्रकारे खेळत राहील, अशी आशा आहे.
"फिटनेस चांगला राहिला तर २०२७ चा वर्ल्डकप खेळू शकतात"
गंभीरने रोहित आणि विराटच्या भविष्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली. विराट आणि रोहित यांच्यात खूप क्रिकेट बाकी आहे. ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहे. कोणताही संघ त्या दोघांना सामील करू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, ऑस्ट्रेलिया मालिका आहे. त्यानंतर फिटनेस चांगलं राहिलं, तर २०२७ चा वर्ल्डकप खेळू शकतात.
मोहम्मद शमीचं पुनरागमन कधी होणार?
गौतम गंभीरने माध्यमांशी बोलताना मोहम्मद शमीबाबतही मोठं विधान केलं. शमीने गोलंदाजी सुरु केली आहे. १९ सप्टेंबरला पहिला कसोटी सामना आहे. त्यावेळी त्याचं पुनरागमन झालं पाहिजे, अशाप्रकारे टार्गेट ठेवलं होतं. त्यावेळी मोहम्मद शमी संघात पुनरागमन करणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना गंभीर म्हणाला, याविषयी मला एनसीएच्या सदस्यांसोबत चर्चा करावी लागेल.