India vs Zimbabwe Googole
क्रीडा

ZIM vs IND: झिम्बाब्वेविरोधात टीम इंडियाने केला धमाका! २० चौकार, १४ षटकार मारून धावांचा डोंगर रचला; ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला

भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेच्या विरोधात दुसऱ्या टी-२० सामन्यात धावांचा डोंगर उभा केला. टीम इंडियाने झिम्बाब्वेला निर्धारित २० षटकांमध्ये २ विकेट्स गमावून २३५ धावांचं आव्हान दिलं आहे.

Published by : Naresh Shende

Zimbabwe vs India, 2nd T20 1st Inning Report : भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेच्या विरोधात दुसऱ्या टी-२० सामन्यात धावांचा डोंगर उभा केला. टीम इंडियाने झिम्बाब्वेला निर्धारित २० षटकांमध्ये २ विकेट्स गमावून २३५ धावांचं आव्हान दिलं आहे. भारतीय संघासाठी अभिषेक शर्माने वादळी शतक ठोकलं. तर ऋतुराज गायकवाडने ७७ धावांची जबरदस्त खेळी केली.

टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मासोबत शुबमन गिल पुन्दा एकदा सलामीला मैदानात उतरला होता. परंतु, या सामन्यात गिलला धावांचा सूर गवसला नाही. इनिंगच्या दुसऱ्या षटकात २ धावांवर असताना गिल बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी मोठी भागिदारी केली. दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या अभिषेक शर्माने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई केली. शर्माने ४७ चेंडूत १०० धावा करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं शतक ठोकलं. यामध्ये ७ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश आहे.

अभिषेक बाद झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडने ४७ चेंडूत ७७ धावा केल्या. यामध्ये ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. झिम्बाब्वेसाठी गोलंदाज ब्लेसिंग मुजराबानी आणि वेलिंग्टन मस्काद्जा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. टीम इंडियाने आपल्या इनिंगमध्ये २० चौकार आणि १४ षटकार ठोकून झिम्बाब्वे विरोधात सर्वात मोठा स्कोअर केला. याआधी ऑस्ट्रेलियाने झिम्बाब्वेविरोधात २२९ धावा केल्या होत्या. टीम इंडियाने झिम्बाब्वेविरोधात सर्वात जास्त १४ षटकार ठोकून दुसरं स्थान प्राप्त केलं आहे. याआधी अफगानिस्तानने झिम्बाब्वेविरोधात एका टी-२० सामन्यात १५ षटकार ठोकले होते.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश